Sunday, November 18 2018 9:50 pm

पुणेकर करणार खगोलदुनियेची सफर

पुणे: खगोलशास्त्राची आवड निर्माण होण्यासाठी पुणे महानगरपालिकने सहकारनगरमधील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये अत्याधुनिक ‘थ्री डी व्हिज्युलायझेशन डिजिटल’ तंत्रज्ञानावर आधारित तारांगण उभारले आहे. त्या माध्यमातून पुणेकरांना आता खगोलविश्वाची सफर घडणार आहे.ह्या तारांगणाला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव दिले असून हे तारांगण संपूर्ण वातानुकूलित असणार आहे अवकाशातील रचना आणि घडामोडी यांचे प्रभावी दर्शन घडविण्यासाठी या तारांगणात अत्याधुनिक व्हिज्युलायझेशनसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा आणि ध्वनी यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे खुर्चीवर बसूनच अवकाशाची सफर नागरिकांना घडणार आहे या तारांगणाच्या निर्मितीसाठी पाच कोटी रुपयांचा खर्च आला असून त्याची आसनाची क्षमता ५२ आहे देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असून येत्या कही दिवसातच मंत्र्यांच्या हस्ते या तारांगण चे उद्घाटन करण्याचा स्थानिक नगरसेवकांचा मानस आहे