Saturday, January 23 2021 1:34 pm

 पी. व्ही. सिंधू -जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय

स्वित्झर्लंड :  भारतीय महिला  बॅडमिंटनपटू  पी. व्ही. सिंधू हिने  जागतिक  बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.  जागतिक बॅडमिंटन  स्पर्धेत सिंधूने तिसऱ्यांदा प्रवेश करून २०१७ च्या स्पर्धेत तिला अपयश आले. परंतू त्या अपयशावर मात करून २०१८ च्या  जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत   पी. व्ही. सिंधूने आज इतिहास रचला. स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद पटकावणारी ती  ती पहिलीच भारतीय ठरली.  अंतिम लढतीत सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराला २१-७, २१-७ असे पराभूत केले.

वयाच्या १७ व्या वर्षी पी.व्ही सिंधू ने आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केली. एवढ्या कमी वयात अशी कामगिरी करणारी ती पहिली बॅडमिंटन खेळाडू ठरली. २०१५  साली पी. व्ही. सिंधू ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सिंधूने नेट प्लेसिंग आणि परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ करताना अवघ्या १६ मिनिटांत पहिला गेम २१-७  असा नावावर केला. सिंधूने पहिल्या गेममध्ये सलग ८ गुणांची कमाई केली.   त्यामुळे ओकुरावर तणाव वाढत गेला आणि नेमका त्याच परिस्थितीचा फायदा घेत सिंधूने पुढच्या अवघ्या सहा मिनिटांत ओकुहारावर ७-२ अशी आघाडी घेतली. त्यानंतर सिंधूने प्रचंड आत्मविश्वासानं खेळ करताना ओकुहाराचा सहज पराभव केला. सिंधूनं हा सामना २१-७, २१-७ असा जिंकला.