Wednesday, June 3 2020 11:13 am

पीएनबीतील दहा हजार कार्डांची माहिती चोरीला

(लोकवृत्तांत ऑनलाइन टीम)
मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार कोटींचा चुना लावून नीरव मोदी फरार झाल्यानंतर पीएनबीतील दहा हजार क्रेडिट व डेबिट कार्डांची माहिती चोरीला गेल्याचे बातमी ‘एशियन टाईम्स’ या हाँगकाँगच्या वृत्तपत्राने याबाबतचे बातमी प्रसिद्ध केली आहे यामुळे या सर्व कार्डधारकांची वैयक्तिक माहिती सायबर चोरांच्या हातात पडली असून ही माहिती हॅकर्सकडून विकली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. पीएनबीच्या कार्डधारकांची वैयक्तिक माहिती गेल्या तीन महिन्यांपासून इंटरनेटवर उपलब्ध होती, असाही गौप्यस्फोट वरील प्रसारमाध्यमाने केला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या कार्डधारकांची वैयक्तिक माहिती चोरीला जात आहे किंवा गेली आहे हे सर्वप्रथम सिंगापूर येथील ‘क्लाऊडसेक इन्फर्मेशन सिक्मयुरिटी’ या संस्थेच्या लक्षात आले. माहितीच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे काम ही कंपनी करते. विशेषतः इंटरनेटवर नोंदणीकृत नसलेल्या साइट्सचा मागोवा घेण्याचा प्रयत्न ही कंपनी करते. क्लाऊडसेकचे मुख्य तांत्रिक अधिकारी ससी यांच्या मते, व्यवहारांमधील विसंगती शोधण्यासाठी कंपनीने काही ‘वॉचडॉग’ किंवा ‘क्रॉलर्स’ नेमले आहेत.