Friday, May 24 2019 6:56 am

पिंपरी-चिंचवड, पुणे, भांडुप आणि आता “ठाण्यात”.

ठाणे-: ठाण्यातही गुरुवारी पहाटे गणेशवाडी सर्व्हिसरोडवर ९ दुचाकी अचानक पेटल्याच्या  घटनेने पुन्हा एकदा ठाण्यात खळबळ उडाली आहे. पूर्वी वागळे, कोपरी परिसरात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती  ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरातील गणेशवाडी या भागात पुन्हा घडली. गुरुवारी  पहाटे दोन ते तीन च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच  आप्पती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या मदतीने जळत्या दुचाकी वीजवण्याचे शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. पेटविण्यात आलेल्या गाड्याच्या बाजूच्या चारचाकी आणि दुचाकी गाड्या आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाला वाचविण्यात  यश मिळवले आहे.  

 

गुरुवारी पहाटे दोनच्या नंतर ठाण्याच्या पाचपाखाडी भागात एक दुचाकी जळत असताना प्रत्यक्षदर्शी याच्या निदर्शनास आली.  नंतर  जवळच असलेल्या अग्निशमन दलाच्या ठिकाण गाठून त्यांना सूचना केली असता घटनास्थळी आप्पती व्यवस्थापन आणि अग्निशमनच्या मदतीने ठाण्याच्या पाचपाखाडी गणेशवाडी सर्व्हिस रोड पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या नऊ दुचाकी वीजवण्यात आल्या .या भागात चार चाकी आणि दुचाकी या भागात पार्किंग करून ठेवलेल्या गाड्या इतर गाड्या या आगीपासून पासून बचावल्या. सदर ठिकाणी पोलिसांनी धाव घेऊन या भागातील नागरिकांची विचारपूस करून नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, दरम्यान या गाड्या पेटल्या कि पेटविल्या याबाबतचे गूढ कायम आहे. या घटनेने परिसरात आणि दुचाकी आणि चारचाकी वाहन मालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस आसपासच्या परिसरात सीसीटीव्ही आहे काय? याची तपासणी करीत आहेत.