Sunday, September 15 2019 11:45 am

पावणाई देवीची बुधवारी यात्रा

कोल्हापुर:इब्राहिमपूर येथील पावणाई देवीची वार्षिक यात्रा बुधवार दि. 21 फेब्रुवारी 2018 रोजी होणार आहे. यात्रेनिमित्त एतिहासिक बा. भ. बोरकर लिखित ‘व्यंकोजी वाघ’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवारी पहाटे देवीची विधीवत पुजा होणार आहे. यानंतर ओटी भरणे, नवस फेडणे, गाऱहाणे घालणे इत्यादी कार्यक्रमानंतर दुपारी देवीची आरती व सभिना फिरणार आहे. सायंकळी श्रीफळ वाढवून यात्रेची सांगता होणार असून पंचक्रोशीतील भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ मंडळामार्फत करण्यात आले आहे.