Sunday, December 16 2018 5:36 am

पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार १०० बोनस जाहीर – कंत्राटी कामगारांना बोनस म्हणून एक महिन्याचा पगार देण्याची घोषणा

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा दिवाळी  बोनसचा तिढा सुटला असून यावर्षी कर्मचाऱ्यांना 15 हजार 100 बोनस जाहीर करण्यात आला आहे . तर कंत्राटी कामगारांना बोनस म्हणून अतिरिक्त एक महिन्याच्या पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . या निर्णयामुळे ठाणे महापालिकेवर 13 कोटींचा बोजा पाडणार आहे . महापालिकेत आतपर्यंत हा सर्वांत जास्त बोनस असल्याचे  म्युनिसिपल लेबर युनियनचे  कार्याध्यक्ष रवी राव यांनी सांगितले .ठाणे महापालिकेचे १० हजार कायस्वरूपी कर्मचारी असून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची संख्या अडीज हजारांच्या घरात आहे .  त्यामुळे दिवाळीच्या अधिक बोनस जाहीर झाली असल्याने कामगारांची दिवाळी गोड होणार आहे . बोनस सोबतच लवकरच सहाव्या वेतन आयोगही मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
        ठाणे पालिकेकच्या विविध विभागात  स्थायी,अस्थायी, ठोक पगारावरील कर्मचारी, अनुकंपा वारसा कर्मचारी अशा १० हजार  कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा निर्णय सोमवारी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि म्युनिसिपल लेबर युनियन अध्यक्ष रवी राव यांच्या बैठकीत घेण्यात आला .  मागीलवर्षी झालेल्या वाटाघाटीत पालिका कर्मचाऱ्यांना १४ हजार बोनस देण्यात आला होता .   यंदा पालिकेच्या उत्पन्नात १० टक्क्यांनी वाढ झाल्याने यंदा कर्मचाऱ्यांना २०  हजाराचे सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशी मागणी महिन्यापूर्वीच म्युनिसिपल लेबर युनियनचे अध्यक्ष रवीराव यांनी केली पालिका आयुक्तांकडे केली होती . मात्र २० हजार बोनस देण्याची मागणी मान्य न करता कायस्वरूपी कामगारांना १५ हजार १०० तर कंत्राटी कामगारांना एक महिन्याचा पगार बोनस म्ह्णून देण्यात येणार आहे . कंत्राटी कामगारांनी एका महिन्यात जेवढी हजेरी लावली आहे तेवढा पगार देण्यात येणार आहे .
        ठाणे महानगर पालिकेत कायस्वरूपी कर्मचाऱ्यांची संख्या  ५ हजार ८३ एवढी आहे .  अनुकंपा वारसा तत्वावरील कर्मचारी २ हजार ५८ ठामपा ठोक पगारावरील कर्मचारी २५२, शिक्षण विभागातील कर्मचारी १ हजार ५१,  शिक्षण विभगातील  ठोक पगारावर कर्मचारी २३  असे एकूण 8 हजार ४६७ कर्मचारी कार्यरत आहेत. महापालिका कामगार कर्मचार्यांना मागील तीन  आर्थिक वर्षात अदा करण्यात आलेल्या सानुग्रह अनुदानात सन २०१४ -१५ मध्ये १२ हजार ५०० ,सन २०१५-१६ मध्ये १३ हजार २५० , सन २०१६ -१७  मध्ये  १४ हजार  सानुग्रह अनुदान देण्यात आले. प्रत्येक वर्षी मागील वर्षाच्या तुलनेत ७५० रुपयांची वाढ सानुग्रह अनुदानात करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे.  मागील वर्षी २० हजार सानुग्रह अनुदानाची मागणी करण्यात आली  होती. प्रत्यक्षात  मागील वर्षी वाटाघाटीत १४ हजार सानुग्रह अनुदान पालिका कर्मचाऱ्यांच्या पदरात पडले होते. यावर्षी देखील  पालिका कर्मचारी यांच्या सोबतच परिवहन सेवेच्या २ हजार २१७ कर्मचाऱ्यांनी देखील यंदा २०  हजाराच्या सानुग्रह अनुदानाची मागणी केली होती . मात्र त्यांनाही १५ हजार १०० बोनस जाहीर केला आहे .सहावा वेतन आयोगाबाबत कोणताही करार करण्यात आला नव्हता . सोमवारी झालेल्या पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि म्युन्सिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये सहाव्या वेतन आयोगावर देखील चर्चा झाली असून डिसेंबर अखेर हा तिढा सोडवणार असल्याचे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले असल्याचे रवी राव यांनी सांगितले . सहावा वेतन अयोग्य लागू झाल्यास पालिकेवर १५ ते २० कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे .