Sunday, April 18 2021 11:49 pm

पालघर, सफाळ्यात प्रवाशांचा रेल रोको

पालघर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु नंतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनानं ठराविक वेळेत महिला प्रवाशांनाही प्रवास करण्यास मुभा दिली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनानं रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे नवे वेळापत्रक ३ डिसेंबरपासून लागू होणार आहे. दरम्यान, ३ डिसेंबर पासून अमलात येणाऱ्या नव्या वेळापत्रकामध्ये मुंबईकडे जाणारी पहिली उपनगरीय गाडीची फेरी रद्द केल्याने पालघर आणि सफाळे येथील प्रवाशांनी उत्स्फूर्त रेल रोको केले.

कोरोना काळात मुंबईकडे अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी डहाणू रोड येथून सकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी सुटणारी चर्चगेट लोकल पश्चिम रेल्वेनं नवीन वेळापत्रकात रद्द केली आहे. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार असल्याने या विषयावर निवेदन लोकप्रतिनिधींच्या दिले होते.

परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्याविषयी कोणतीही ठोस कृती न झाल्याने रेल्वे प्रवाशांनी आज (बुधवार) पहाटे पालघर रेल्वे स्थानकात तसेच सफाळे रेल्वे स्थानकात रेल रोको केले. यामुळे मुंबईकडे जाणारी राजधानी एक्सप्रेस तसेच डहाणूकडे जाणारी लोकल रोखून ठेवण्यात आली होती…