Sunday, April 18 2021 11:39 pm

पालघरच्या पोलीस अधीक्षकपदी दत्तात्रय शिंदे यांची नेमणूक

पालघर : जिल्ह्यात गडचिंचोली येथे झालेल्या साधूंच्या हत्याकांडप्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी दत्तात्रेय शिंदे यांची पालघरच्या पोलीस अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

१६ एप्रिलच्या सायंकाळी गुजरातकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाची कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गडचिंचले येथे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी दोन पोलीस अधिकारी व तीन पोलीस कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई यापूर्वी करण्यात आली होती. तसेच पालघरचे पोलिस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.

दरम्यान पालघरचे पोलिस अधीक्षकपदी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड च्या कार्यकारी संचालकपदी असलेल्या दत्तात्रय शिंदे यांची नेमणूक गृह विभागाकडून आज करण्यात आली. यापूर्वी दत्तात्रय शिंदे यांनी यांनी सिंधुदुर्ग सांगली आणि जळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख पदी काम पाहिले आहे.