Tuesday, November 19 2019 3:14 am
ताजी बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण

ठाणे :-  भारतीय स्वातंत्र्याचा ७२ वा वर्धापन दिन समारंभ आज ठाणे जिल्हाधिकारी प्रांगणात पार पडला. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर उपस्थित होते. या समारंभास खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, रवींद्र फाटक, सुभाष भोईर, प्रताप सरनाईक, महापौर मीनाक्षी शिंदे, जिल्हाधिकारी यांच्या पत्नी सीमा नार्वेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव, उपाध्यक्ष सुभाष पवार, माजी आमदार आनंत तरे, ठाणे मनपा आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील आदींची उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी, नागरिक यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात बोलतांना पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या वर्षीचा स्वातंत्र्य दिन हा विशेष आहे. 370 व 35 ए हा कलम रद्द झाल्याने देशांत आनंदाचे वातावरण असून काश्मिरी बांधवाना मुळ प्रवाहात आणणे गरजेचे आहे. पूरपरिस्थितीत महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये अडकलेल्या हजारो प्रवाशांना सुखरुप बाहेर काढल्याबद्दल तसेच जिल्ह्यात महापुरात अडकलेल्यांना मदतीचा हात दिल्याबद्दल जिल्हा प्रशासन, मदत पथके, पोलीस दल, सेवाभावी
सामाजिक संस्था, स्थानिक नागरिक यांचे मंत्री महोदयांनी अभिनंदन केले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून या जिल्ह्याचा गतिमान विकास
करण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली. गुणवंतांचा सन्मान पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी सन 2018 मध्ये केलेल्या प्रशंसनीय सेवेबदल मंत्री महोदय यांच्या हस्ते धातूचे बोध चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

त्याचप्रमाणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व राष्ट्रीय प्रज्ञा शोध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.वन विभाग व सामाजिक वनीकरण ठाणे यांचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 201साठी महसुल विभाग ठाणे अंतर्गत व्यक्ती, शैक्षणिक संस्था यांना पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले .तसेच सन 2017-18 व 2018-19 चे गुणवंत खेळाडू पुरस्कार, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, गुणवंत क्रीडा कार्यकर्ते, संघटक यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले. या कार्यक्रमांचे सुत्र संचालन डॉ.तरुलता धानके यांनी केले.