Friday, May 24 2019 9:00 am

पारसिक रेतीबंदर येथील झोपडपट्टयांना आकर्षक रंगरंगोटी !

मुंब्रा -: ‘ठाणे महानगरपालिका’ आणि ‘मिसाल मुंबई’ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पारसिक रेतीबंदर येथील झोपडपट्टयांना आकर्षक रंगरंगोटी करण्यात अली तसेच तेथील मुलभूत कामे करण्याचा शुभारंभ मा.महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी पार पडले.
यावेळी मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षा सौअनिता किणेस्थानिक नगरसेविका सौदीपाली भगतसमाजसेविका ऋता आव्हाडउपायुक्त संदीप माळवीमनीष जोशीवैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉकेंद्रेनगर अभियंता राजन खांडपेकरशहर व नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकरउपनगर अभियंता अर्जून आहिरेकार्यकारी अभियंता धनंजय गोसावीश्रीतायडेसहाय्यक आयुक्त महेश आहेरसौसंगीता पालेकरबबलू शेमना आदी उपस्थित होते.

ठाणे महानगरपालिका अंतर्गत हि तिसरी झोपडपट्टी आहे त्याची आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली. ह्या झोपडपट्टींना आकर्षक रंगरंगोटीमुळे “मिसाल मुंबई” च्या टीमचे आभार महापालिका आयुक्त “संजीव जयस्वाल” यांनी आभार मानले..
झोपडपट्टीतील समस्याचे निर्वार्ण आणि विकासाच्या अनुशगांने पाहणारे झोपडपट्टीत जाऊन समस्या जाणून घेणारे अधिकारी म्हणजे संजय जयस्वाल आहेत . आपल्या कामाने उदारांत करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संजीव जयस्वाल होय.व तसेच ‘मिसाल मुंबई’ ह्या एन.जी.ओ संस्था ह्यांचे देखील आभार “आमदार जितेंद्र आव्हाड” यांनी मांडले.
ब्युटीफिकेशन आर्टस् ने लोकांशीं जोडायचे आहेत म.न.पा शाळेतील , हेल्थ कॅम्पसाठी अशी अनेक कामे करण्यासाठी “टिम वर्क” ने साध्य करता येतात. अजून हि अनेक परिसरात काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे मत ‘मिसाल मुंबई’ ह्या एन.जी.ओ संस्थाचे ‘रूबल नागी’ मॅम ह्यांनी मांडले. ह्यावेळी त्यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि आमदार जितेंद्र आव्हाड ह्यांचे हि आभार मांडले.