Monday, January 27 2020 8:14 pm

बंदी असून पांडवकडा धबधब्यावर फिरायला गेलेल्या ४ विद्यार्थिनी वाहून गेल्या

नवी मुंबई : – नवी मुंबईतील पांडवकडा धबधब्याच्या परिसरात पर्यटकांना बंदी घातली असून देखील  धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या काही अतिउत्साही  महाविद्यालयीन तरुण-तरुणीच्या जीवावर बेतले आहे. पावसाळ्यात  फिरायला गेलेल्या विद्यार्थिनींपैकी चार विद्यार्थिनी वाहून गेल्या असून त्यांपैकी तीन मुलीचा मृतदेह हाती लागला आहे. आणखी एका विद्यार्थिनींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुंबईसह उपनगरात शुक्रवार रात्री पासून मुसळधार पावसामुळे जोर धरला आहे. पावसाळ्यात पांडवकडा धबधबा पाहण्यासाठी मुंबई, ठाणे आणि, रायगडामधील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र वनविभागाने सुरक्षेच्या कारणास्तव पांडवकडा धबधब्याच्या परिसरात पर्यटकांना बंदी घातली आहे. तरीसुद्धा आज सकाळी आठच्या सुमारास नवी मुंबई आणि मुंबईतील काही महाविद्यालयीन तरुण-तरुणी पांडवकडा धबधबा पाहण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी पांडवकडा परीसरातील धामोळा पाडा डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा नाल्यात चार जण वाहून गेले. या घटनेची माहिती कळताच पोलीस आणि अग्निशामक दल पांडवकडा धबधब्याजवळ पोहचले आहेत. त्यांनी तत्काळ या तरुणींना बाहेर काढण्यासाठी रेस्कू केले आहे. दरम्यान या रेस्कू मध्ये दोन तरुणींचे मृतदेह हाती लागले आहे. नेहा जैन आणि आरती नायर असे या दोन मुलीचे नवे आहेत. तर अन्य दोन मुलींचा तपास अजूनही पोलीस आणि रेस्कू टीम करीत आहे.