Thursday, November 21 2019 3:43 am

‘पहले मंदिर, फिर सरकार’ अयोध्यात शिवसेनेचा नारा

अयोध्या :- एकीकडे आज राज्यात राज्य मंत्रीमंडळाचे विस्तार सोहळा पडला असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या नवनिर्वाचित १८ खासदारांसह अयोध्या दौऱ्या वरआहेत. उद्धव ठाकरे यांनी  १८ खासदारांसह अयोध्येतील रामजन्मभूमीवर जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं. राम मंदिरासाठी अध्यादेश आणावा व कायदा बनवून भव्य राम मंदिराची उभारणी करावी,अशी मागणी  उद्धव यांनी अयोध्यातील पत्रकार परिषदेत  केली.

‘पहले मंदिर, फिर सरकार’  अशी घोषणा देखील यावेळी अयोध्यात देण्यात आली त्यानंतर ‘पहले मंदिर, फिर संसद’ असा सूर लावण्यात असून उद्यापासून संसदेचं कामकाज सुरू होत असून रामलल्लाचं दर्शन घेऊनच शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार आपली नवी इनिंग सुरू करत आहेत, असे उद्धव म्हणाले.
अयोध्येत राम मंदिर व्हावं, या प्रमुख मुद्द्यावर शिवसेनेने भाजपसोबत युती केलेली आहे. आता देशात पुन्हा एकदा पूर्ण बहुमत असलेलं सरकार आल्याने राम मंदिर निर्माणाला वेग आला पाहिजे, अशी अपेक्षा अयोध्येत भव्य राम मंदिर व्हावं, ही जनतेची भावना असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पवित्र काम निश्चितच करतील, हा आमचा विश्वास असल्याचे नमूद करताना, या कार्यात त्यांना आमची पूर्ण साथ राहील, असेही उद्धव पुढे म्हणाले. मोदींसाठी कोणतंच काम कठीण नाही. त्यांनी अनेक अशक्य गोष्टी सहज शक्य करून दाखवलेल्या आहेत, असं कौतुकही उद्धव यांनी केलं. राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले.