Monday, January 27 2020 3:10 pm

पब्जीसाठी मोबाईलला नकार दिल्याने मुलाने पित्याचा केला गळा कापून खून

बेळगाव :-  पब्जी गेम खेळणाऱ्या मुलाला मोबाईल घेऊन न देणाऱ्या वडिलांच्या गळ्यावर मुलाने विळा घेऊन  वार केल्याची घटना बेळगाव येथे घडली. गळ्यावर वार करूनहि मुलाचे मन भरले नाही म्हणून त्याने वडिलांचा उजवा पाय कापून वेगळा केला. रघुवीर कुंभार असे आरोपी मुलाचे नाव असून शंकर कुंभार असे हत्या झालेल्या वडिलांचे नाव आहे.रघुवीर हा सतत मोबाईल वर पब्जी खेळत असल्याने वडिलांनी त्याला अनेक वेळा  पब्जी खेळू नको असे सांगितले. बाप लेका मध्ये अनेक वेळा बचा बाची देखील झाली. रघुवीर ने वडिलांकडे पब्जी साठी नवीन मोबाईलची मागणी केली. वडिलांनी नवीन मोबाईल घेण्यास नकार देल्याने  सकाळ सकाळी त्याने आईला एका खोलीत बंद केले व वडिलांना लात मारून खाली पाडले, वडिलांच्या गळ्यावर विळ्याने वार करत जन्म दात्या वडिलांची हत्या केली.  गळ्यावर वार करूनहि मुलाचे मन भरले नाही म्हणून त्याने वडिलांचा उजवा पाय कापून वेगळा केला. बेळगाव पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात यश आले आहे.