Friday, May 24 2019 9:04 am

पत्नीचे पैसे खर्च करणं पतीच्या जीवावर बेतलं !

पिंपरी-चिंचवड: पतीने पत्नीचा पैशांसाठी छळ केला हे आपण ऐकलं असेल, परंतु पिंपरी-चिंचवड मध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या केली , ह्याप्रसंगी चिखली पोलिसांनी पत्नीला अटक केली.
१३ नोव्हेंबरला जय तेलवणी ह्याने आत्महत्या केली व या आत्महत्येला कारणीभूत त्याची बायको तृप्ती तेलवणी आहे, अशी तक्रार जय च्या आईने पोलिसांकडे केली आणि पोलिसांनी तपास करून जय तेलवणी याची पत्नी तृप्ती तेलवणी हिला अटक केली.
जय तेलवानी यांच्या कुटुंबीयांच्या ताक्रारीनुसार, “तृप्तीला पैसे खर्च करायची सवय होती. यासाठी तिने जयला कर्ज ही काढायला भाग पाडलं होतं. पैशांची
पूर्तता न भागवल्यास केल्यास ती पतीला शिवीगाळ करून मारहाण करत असे. तसंच स्वतःचं बरं-वाईट करुन घेण्याची धमकीही देत असे. ह्या त्रासात अजून भर म्हणून, जयच्या एका व्हिडीओचा टीक-टॉक (दुसयाचाआवाज देऊन) करून तो स्वताःला कॅन्सर झाल्याचा सांगतोय असं भासवले. आणि हा व्हीडीओ ती जयच्या मित्रांना दाखवत असे.
साधारण चार वर्षाच्या संसारात केवळ एकच वर्ष सुखाचा संसार केल्यानंतर मार्च 2018 पासून तृप्तीने पैशासाठी जयचा असा छळ केल्याचं आरोप सासूने केला आहे.