ठाणे,21 :- किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडील पणन हंगाम २०२३-२४ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान/ भरडधान्य खरेदी करण्याबाबत शासनाने शासन निर्णय क्रमांक खरेदी-११२३/प्र.क्र.१२३/नापु – २९, दि.९ नोव्हेंबर २०२३ अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
शासनाने धान व भरडधान्य खरेदी करण्यासाठी बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को.ऑप मार्केटिंग फेडरेशन, मुंबई व आदिवासी क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक या दोन अभिकर्ता संस्थांची नियुक्ती केलेली आहे. त्यानुसार या संस्थाचे ठाणे जिल्ह्यामध्ये १. जिल्हा मार्केटिंग अधिकारी ठाणे, २. प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, प्रादेशिक कार्यालय जव्हार, जि. पालघर हे कार्यरत आहेत.
शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक ३ मध्ये आधारभूत किंमती सर्वसाधारण गुणवत्ता व दर्जा पुढीलप्रमाणे आहे-
धान/भात (एफ ए क्यू) :-
अ) साधारण – आधारभूत किंमत रु. 2 हजार 183. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर रु. 2 हजार 183.
ब) अ दर्जा – आधारभूत किंमत रु. 2 हजार 203. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर रु.2 हजार 203.
भरडधान्य :-
ज्वारी संकरित – आधारभूत किंमत रु. 3 हजार 180, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर रु. 3 हजार 180.
ज्वारी मालदांडी – आधारभूत किंमत रु. 3 हजार 225, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर रु. 3 हजार 225.
बाजरी – आधारभूत किंमत रु.2 हजार 500, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर रु. 2 हजार 500.
मका – आधारभूत किंमत रु. 2 हजार 90. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर रु. 2 हजार 90.
रागी – आधारभूत किंमत रु. 3 हजार 846. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर रु. 3 हजार 846.
धान खरेदीचा कालावधी – खरीप पणन हंगाम- दि.१ नोव्हेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४.
धान/भरड धान्य – खरीप पणन हंगाम (रब्बी/उन्हाळी) केंद्र शासनाकडून प्राप्त सूचनानुसार राहील.
ठाणे जिल्हयामध्ये बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को. ऑप. मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास क्षेत्रामध्ये आदिवासी विकास महामंडळ या दोन यंत्रणा कार्यरत असून सन 2023-24 या खरीप पणन हंगामाकरिता धान (भात) खरेदी करण्यासाठी अभिकर्ता संस्थाना शेतकऱ्याकडील धान खरेदी करण्यासाठी पुढीलप्रमाणे धान खरेदी केंद्रे सुरु करण्याच्या सूचना दि.10 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत दिलेल्या आहेत.
अभिकर्ता संस्था – दि. महाराष्ट्र स्टेट को. ऑप मार्केटिंग फेडरेशन मर्या. तर्फे जिल्हा मार्केटिग अधिकारी, ठाणे.
धान खरेदी केंद्राचे ठिकाण –
तालुका भिवंडी – 1.दुगाडफाटा, 2.पडघा व 3. झिडके. कल्याण तालुका – 1.चवरे (मामनाली).
तालुका मुरबाड – 1. मुरबाड .
अभिकर्ता संस्था – म.रा. सह. आ.वि.महा. मर्या. तर्फे प्रादेशिक व्यवस्थापक, म.रा. सह. आ. वि. महा., प्रादेशिक
कार्यालय जव्हार, जि.पालघर.
धान खरेदी केंद्राचे ठिकाण –
तालुका शहापूर – 1. सावरोली, 2. खोर, 3. चरिव, 4. चोंढे, 5. मुगाव, 6. बोरशेती, 7. भातसानगर
तालुका मुरबाड – 1.धसई, 2.माळ, 3.पाटगाव.