Tuesday, July 14 2020 12:59 pm
ताजी बातमी

पंधरा वर्ष गाड़ी धुणारया  नेपाळी  इसमाने साथीदारासह केली घरफोडी

 

ठाणे :- ठाकुर्लि ठाणे येथे राहणारे  रमेश पाटील हे आपल्या परीवारासह दिनांक 13/3/2018  सकाळी  10 च्या  दरम्यान  जेजुरी पुणे येथे गोंधळाच्या  कार्यक्रमास गेले होते , दुसर्या दिवशी 14 तारखेला रात्री 10:30 वाजता ते परत आले असता त्याना आपल्या बंगल्याच्या  पहील्या व दुसऱ्या  मजल्यावरील बाथरूमचे ग्रील उचकटलेले दिसले वबंगल्याच्या  आतील सोन्या चांदिचे दागीने , महगडि मनगटि घड्याळ , मोबाईल फोन व रोख 4,30,000/- रुपये कँश असा एकुण 27,54,000 रूपयाचा माल घरफोडी करून नेल्याचे लक्षात आले , डोंबिवलि पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणि गुन्हा दाखल करण्यात आला , या गुन्ह्याचा समांतर शोध मालमता गुन्हे कक्ष करत होते , या पथकातील पोलीस हवालदार बाळासाहेब भोसले यांना माहीती मिळाली  की ही घरफोडी फीर्यादी परेश पाटील यांच्या गाड्या धुणारा नेपाळी नोकर  किशन साही व त्याच्या साथीदारानी केली आहे , व त्यातील आरोपी हे पेंढारकर कॉलेज डोंबिवलि पूर्व येथे येणार आहेत , त्यांनी ही  माहीती  वरिष्ट पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण याना दिली , त्यानी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन तडाखे पोलीस हवालदार बाळासाहेब भोसले , शामराव कदम , गणेश पाटील , अरविंद शेजवल असे खास पथक तयार करून पेंढारकर कॉलेज येथे सापळा रचून संशयीत आरोपीना अटक केली , त्यांची जागेवरच  झडती घेतली असता त्यांच्या जवळ  6 महागडे वेगवेगळ्या कंपन्यानचे  मोबाईल फोन आणि 28,330/- रोख रक्कम मिळुन आली , त्यांच्या कड़े सखोल चौकशी केली असता त्यानी ही चोरी त्यांचा आणखी एक साथीदार मामा उर्फ कमल साही नेपाली याचेसह   केल्याचे कबूल केले , या चारही आरोपींची नाव 1)किसन डमरबहादुर साही वय 34 , 2)रोशन उर्फ जीवन पदम साही वय 25 रहणार नवी  मुंबई 3) राजु रतन उर्फ बाबु ओम बहादुर साही वय 32 ,राहणार सदर 4) जिरबहादुर एनबहादुर साही वय 25 राहणार सदर अशी आहेत , विशेष म्हणजे आरोपी किसन साही हा गेली पंधरा वर्ष फीर्यादी परेश पाटील यांच्या कडे गाडी धुण्याच काम करत होता , इतकी वर्ष काम केल्यामुळे  पाटील परीवारचा किसन साही वर विश्वास बसला होता , कुठे बाहेर जाताना ते बंगल्याची चावी त्याच्या कड़े देउन जात असत , अशा विश्वासु नोकरानेच पाटील यांचा विश्वास घात केला ,हे सगळे आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यानी बऱ्याच  ठिकाणी गुन्हे केल्याची शक्यता आहे , या आरोपीनी येताना सोबत सोन्याचा वजन काटा आणला होता , दरोडा टाकुन ठाकुर्लि स्टेशन जवळील  रेल्वे पटरिवर जावुन चोरलेल्या मालाच्या वाटण्या  केल्या  होत्या ,  हयाच्यातील एक आरोपी कमल रामबहादुर साही उर्फ मामा हा त्याचे मुळ गावी तरंगा गांव नेपाल येथे पळुन  गेला असल्याने सीबीआय इंटर पोलच्या माध्यमातून नेपाळ  या देशाशी आरोपी हस्तांतरण संबंधी पत्रव्यवहार करुन त्याला ताब्यात घेण्याचि तजवीज केली आहे , असे अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यानी सांगितले , एक आरोपी नेपाळ ला  गेल्या मुले आणि बरोबर आपला हिस्सा घेउन गेल्यामुले 19,71,520/- रूपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे , अन्यथा शंभर टक्के माल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले असते .