Tuesday, July 23 2019 1:51 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचा फर्स्ट लूक प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूडमध्ये या वर्षांत तीन मोठ्या राजकीय नेत्यांवरील बायोपिक प्रदर्शित होत आहे. माजी पंतप्रधन मनमोहन सिंग, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरें आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर देखील जीवनपट येत आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. पीएम नरेंद्र मोदी’ असं या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय हा प्रमुख भूमिकेत असणार आहे.

गेल्याच आठवड्यात विवेकच्या नावाची अधिकृत घोषणा या चित्रपटासाठी करण्यात आली होती. विवेक हा गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमधल्या झगमगत्या दुनियेपासून लांब आहे त्यामुळे विवेकची निवड या भूमिकेसाठी कशी झाली याचे कुतूहल अनेकांना होतं. त्यातूनच विवेकच्या नावाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर त्याच्या नावाची खिल्लीही उडवण्यात आली होती. मात्र नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’च्या पहिल्या पोस्टरमध्ये विवेक ओळखूही येत नाही. विवेकचा लूक हा मोदींच्या जवळपास जाणारा आहे असे म्हणत अनेकांनी कौतुक केले आहे.