Saturday, January 18 2025 5:20 am
latest

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील १३० कोटी जनतेच्या स्वप्नाचं सामर्थ्य असलेला नेता केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील    

ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील १३० कोटी जनतेच्या स्वप्नाचं सामर्थ्य असलेला नेता आहेत. नरेंद्र मोदी यांनी गेल्या ८ वर्षात जी कामे केली ती आधीचे सरकार करू शकले नाही त्यामुळे ८ वर्षानंतर नागरिकांच्या डोळ्यात मोदींबद्दल आत्मविश्वास पाहायला मिळतो, असे गौरवोद्गार केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी ठाण्यात काढले. ठाण्यात आयोजित ओबीसी कल्याण संमेलनात ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद व केंद्र सरकारला आठ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण अंतर्गत भारतीय जनता पार्टी ओबोसी मोर्चा ठाणे शहर यांच्या वतीने ओबीसी कल्याण संमेलन आयोजित करण्यात आले होता त्यानिमित्त ओबीसीसाठी काम करणाऱ्या विविध मान्यवर व संस्थांचा सन्मान सोहळा ठाण्यातील कळवा येथील सायबा हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील,आमदार संजय केळकर,भाजपा ठाणे शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे,प्रदेश सचिव संदीप लेले,प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, भाजपा ओबोसी मोर्चा ठाणे शहर अध्यक्ष सचिन केदारी,महिला अध्यक्ष नयना भोईर,नगरसेवक संजय वाघुले,नगरसेविका नम्रता कोळी,दीपा गावंड,अर्चना मणेरा,ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव हरिश्चंद्र भोईर, जिल्हा सरचिटणीस कैलास म्हात्रे, माजी उपमहापौर अशोक भॊईर, मनोहर सुगदरे, जयेंद्र कोळी, सुरेश पाटील, सरचिटणीस बाबु रामन्ना, किरण धतूरे, नयना भोईर, श्रुतिका कोलीमोरेकर, महेश  सपकाले, नरेश ठाकुर,नागेश भोसले,छञपती पुर्णेकर, हरेश पूर्णेकर,सुनिल बांगर,कुष्णकुमार यादव,महेश तेरे,अॅड.अमित पाटील,नरेश पवार,धिरज कपोते,मनोज साळवी, सुर्दशन साळवी आदी सह मान्यवर यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन केदारी यांनी केले होते.

यावेळी पुढे बोलताना मंत्री कपिल पाटील म्हणाले कि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचा १३० करोड जनतेचे आत्मविश्वास,संकल्प व स्वप्नाचं सामर्थ्य असलेले नेते आहेत. त्यामुळे आपण भाग्यवान आहोत कि नरेंद्र मोदी सारखे नेतृत्व आपल्याला लाभले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षांच्या काळात विविध लोकोपयोगी योजना सुरू केल्या. केवळ सामान्य व्यक्ती हाच केंद्रबिंदू ठेवून योजना आखल्या गेल्या. आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळाला. त्यामुळे ८ वर्षांनंतर  जनतेच्या डोळ्यात आत्मविश्वास पाहण्यास मिळतो व या आठ वर्षाच्या कालावधीत एकही मंत्रावर भष्ट्राचाराचा आरोप नाही हे आपल्या कामाचे फलित असल्याचे यावेळी श्री पाटील म्हणाले.राज्य सरकारचा अपयशामुळे ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले नाही.याला सर्वस्वी महाविकास आघाडी जबाबदार आहे.ओबीसीवर अन्याय झाला असून जर राज्य सरकारने योग्य ती बाजू न्यायालयात मांडली तर पुढचा निर्णय घेणे शक्य होणार आहे. तसंच ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी भूमिका केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी संमेलनात मांडली.