Monday, June 1 2020 2:46 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधींना वाहिली आदरांजली

दिल्ली : – लोकसभा निवडणूक  च्या  दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधींवर भ्रष्टाचारी नं १ असण्याची टीका केली होती.  नौदलाच्या जहाजांचा वैयक्तिक पार्टींसाठी वापर करण्याचा आरोप करणाऱ्या नरेंद्र मोदी यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एरवी आदरांजली वाहताना मोदी त्या व्यक्तीची थोडीशी स्तुतीही करत असतात. राजीव गांधींना श्रद्धांजली वाहताना मात्र अशी स्तुती करणं मोदींनी टाळलं आहे.