Monday, October 26 2020 4:07 pm

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ भारतीय जनता पार्टी ठाणे आयोजित सेवा सप्ताह नौपाडा मंडलात उत्साहात साजरा.

ठाणे :  पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ नौपाडा मंडलात 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान मा आमदार निरंजनजी डावखरे (ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष ) आमदार संजयजी केळकर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि नगरसेवक सुनेश जोशी (नौपाडा मंडल अध्यक्ष)यांच्या नेतृत्वाखाली सेवा सप्ताह साजरा करण्यात आला या निमित्ताने नौपाडा मंडलात बिविध ठिकाणी नेत्र तपासणी व चस्मा वाटप शिबीर, कौशल्य ठाणे हेल्थ केअर,पानंदीकर हॉस्पिटल मध्ये फळ वाटप आणि भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच जेष्ठ नगरसेवक ठामपा गटनेते संजयजी वाघुले नारायण पवार मंडल चिटणीस विशाल वाघ यांच्या तर्फे वृक्षा रोपण दिव्यांगनाना साहित्य वाटप फळ वाटप व महापालिकेतील सफाई कर्मचार्यांना मास्क व प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. सर्वात महत्वाचे म्हणजे या निमित्ताने प्लास्टिक संकलनात नागरिकांचा तसेच गृहनिर्माण संकुलांचा सहभाग वाढवा म्हणून समर्थ भारत व्यासपीठ निर्मित “रिसायकल्ड अर्थ” या ऍप चे आमदार निरंजनजी डावखरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले . या सर्व कार्यक्रमाना भाजपा नेते माजी मंत्री आमदार विनोदजी तावडे आमदार प्रसादजी लाड,प्रदेश सचिव संदीप लेले,जेष्ठ नगरसेवक अशोक राऊळ,नगरसेविका मृणाल पेंडसे,नम्रता कोळी, नगरसेवक सुनील हंडोरे समाजसेवक डॉ राजेश मढवी ,भटू सावंत,भाजप सरचिटणीस विलास साठे कैलास म्हात्रे,मनोहर सुखदरे,युवा मोर्चा अध्यक्ष निलेश पाटील जयंद्र कोळी सचिन केदारी रमेश सागळे किशोर गुणिजन निलेश कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नौपाडा मंडल सरचिटणीस राजेश ठाकरे प्रमोद घोलप , महिला आघाडी अध्यक्ष विशाखा कणकोसे भारतीय जनता युवा मोर्चा चे नौपाडा मंडल अध्यक्ष प्रशांत कळंबटे विनायक गाडेकर अपूर्व कडव ओमकार महिमकर भाजप महिला आघाडीच्या संहिता देव-देशमुख,शिल्पा उतेकर व नौपाडा मंडलातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.