Tuesday, July 23 2019 10:41 am

पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना 5 लाख रेनकोटचे वाटप

नाशिक :- जून महिनेच्या अखेरील  त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी  आज हजारो वारकऱ्यांसह पंढरपूरकडे पाऊले टाकली आहेत. आषाढी वारीसाठी सुरुवात होताच  10 ते 15 किलोमीटर पार केल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. परंतु काहीं वेळेतच   वारकऱ्यांना  स्वयंसेवकांकडून रेनकोट वाटण्यात आले.  दरम्यान यावर्षी विविध पालख्यांद्वारे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना 5 लाख रेनकोटचे वाटप केले जाणार असल्याची माहिती स्वयंसेवकांनी दिली.आषाढ महिना सुरु होण्या आधी वारकऱ्यांना आषाढी वारीची ओढ लागते. परंतु आषाढ महिन्यात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने वारकऱ्यांना भर पावसात मार्गक्रमण करावे लागते. या वारीत सहभागी होणारे बहुतांश वारकरी हे शेतकरी, कामगार तसेच मजूर वर्गातील असतात. त्यामुळे बहुतांश वारकऱ्यांना पावसापासून वाचण्यासाठी छत्री किंवा रेनकोट खरेदी करणे परवडणारे नसते. त्यामुळे यावर्षी सरकारने वारकऱ्यांना रेनकोट देण्याता निर्णय घेतला आहे.दरम्यान आज संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यासाठी हजारो वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले होते. सकाळी निवृत्तीनाथांच्या पादुका मंदिराबाहेर आणण्यात आल्या. पूजा, आरती, अभंग आणि भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज की जय आणि ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करत पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे.