Friday, December 13 2024 12:31 pm

पंढरपुरी वारीत सह्याद्री मानव सेवा मंच अंतर्गत समाजसेवक डॉ.राजेश मढवीकडून माऊलींचे सेवाकार्य….

माऊलीच्या चरणी सेवा योग!

पंढरपुरी वारीत सह्याद्री मानव सेवा मंच अंतर्गत समाजसेवक डॉ.राजेश मढवीकडून माऊलींचे सेवाकार्य….

ठाणे, 12 – महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे जाऊन मिळणारी वारकरी संप्रदायाची पदयात्रा म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाती-धर्माची लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात.वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. पंढरिचा वास! चंद्रभागे स्नान! आणिक दर्शन विठोबाचे! या एका इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत;अशी भागवत संप्रदयाची धारणा आहे.
अशा या पंढरपुर वारीत यंदा ४० व्या वर्षात डॉ.विश्वास सापटणेकर यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री मानव सेवा मंचाचे शेकडो स्वयंसेवक व सेवाभावी डॉक्टर मंडळी आपली निस्वार्थ सेवा देतात. सालाबादप्रमाणे यंदाही डॉ.राजेश मढवी फाऊंडेशनच्या वतीने डॉ.राजेश मढवी यांनी आपल्या चमूसह नातेपुते येथिल आरोग्य शिबीरात माऊलीच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. या शिबीरात हजाराच्यावर माऊलींना अंगदुखी, पायदुखी, सर्दी, पडसे, ताप,अतिसार,उच्च रक्तदाब,जुलाब, अशा विविध आजारांवर औषधोपचार, सलाईन मलमपट्टी अशा प्रकारे इलाज करण्यात आला. त्याचबरोबर छोट्या शस्त्रक्रिया, टाके घालणे,पाय दुखी साठी तेलवगैरेने मसाज अशा सेवा देण्यात आल्या.यासाठी संस्थेच्या वतीने सर्जन डॉ.विश्वास सापटणेकर डॉ. राजेश मढवी,डॉ. बेके,डॉ. राव, डॉ. बापट, ज्योती हर्डीकर,रवींद्र कराडकर, विनय नाफडे,निशिकांत महाकाळ, राजेंद्र शहा, उदय पोवळीकर आणि इतर सेवेकरी सेवा देत होते.