Sunday, March 24 2019 12:34 pm

न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींमध्ये हल्लेखोरांनी केला गोळीबार, 27 जणांचा मृत्यू,

वेलिंग्टनः न्यूझीलंडमधल्या ख्राइस्टचर्च इथल्या दोन मशिदींमध्ये काही अज्ञात हल्लेखोरांकडून  गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात  27 जणांचा मृत्यू झाला असून  हल्लेखोरांनी काळे कपडे घालून मशिदींमध्ये गोळीबार करण्यास सुरुवात केली.न्यूझीलंडच्या पोलिसांनी हल्लेखोर गोळीबार करत असलेल्या परिसराला चारही बाजूंनी घेरलं आहे. एका प्रत्यक्षदर्शीनं 4 ते 5 लोकांना गोळीबार करताना पाहिलं आहे. या हल्लेखोरांमध्ये १ महिला व ३ पुरुषांचा समावेश आहे.
 बांगलादेशची क्रिकेट  टीम सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असून  घटनास्थळी बांगलादेशच्या क्रिकेट संघाचे खेळाडूही उपस्थित होते. बांगलादेशातील क्रिकेट टीमचा खेळाडू तमीम इक्बालनं ट्विट करून म्हणाला कि, गोळीबारात पूर्ण बांगलादेशची टीम थोडक्यात बचावली आहे. हा फारच भीतीदायक अनुभव असल्याचंही तमीम इक्बालनं सांगितलं आहे. खेळाडू बसमधून उतरून मशिदीत जाणार होते कि, त्याचदरम्यान हा गोळीबार झाला. संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मशिदीत गर्दी होते तेव्हा हा गोळीबार करण्यात आला, अशी माहिती बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ते जलाल युनिस यांनी दिली.