Thursday, January 28 2021 6:51 am

न्यूझीलंडची भारतावर 80 धावांनी मात

वेलिंग्टन: वनडे मालिकेपाठोपाठ आता टी २० मालिका आजपासून सुरू झाली आहे. न्यूझीलैंड सोबत असलेल्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय क्रिकेट संघाचा  पहिल्याच सामन्यात  ८० धावांनी पराभव झाला आहे.

वनडे मालिकेत 4-1 असा आजवरचा सर्वात मोठा विजय भारतीय संघाने मिळवला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती करण्यास भारतीय संघ सज्ज झाला आहे. आजच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचे फलंदाज सी मुन्रो (३४), सिफर्ट (८४)कर्णधार विल्यम्सन (३४), मिचेल (८), टेलर (23), कॉलिन दि ग्रँडहॉम (३) बाद झाले. भारतासमोर न्यूझीलंडने २१९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. जिंकण्यासाठी भारताला २२० धावा करण्याची गरज होती . फलंदाजीच्या सुरुवातीलाच रोहित शर्मा(१) बाद झाला तर त्याच्या पाठोपाठ धवन (२९), वी शंकर (27), पंत (४), कार्तिक (५) आणि पांड्या (४) बाद झाले आणि भारताला परभावाचा सामना करवा लागला .न्यूझीलंडने दिलेले 220 धावांचे आव्हान पार करताना भारताचा डाव पुन्हा कोलमडला. 19.2 षटकात भारतीय संघ फक्त 139 धावांपर्यंत मजल मारु शकला.