Saturday, January 18 2025 6:05 am
latest

नोटबंदीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल

नवी दिल्ली, 2 : केंद्र सरकारने2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला.
केंद्र सरकारने 2016 मध्ये घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टाने सोमवारी निकाल दिला. मोदी सरकारने सहा वर्षापूर्वी हा निर्णय घेताना एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. न्या. एस.ए नाझीर यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने या प्रकरणावर सोमवारी निकाल दिला.