Tuesday, June 2 2020 3:09 am

नोकरीच्या पहिल्याच दिवशी आयुष्याचा शेवट

नवी मुंबई :-  दोन अज्ञात व्यक्तींनी  टॅक्सी चालकाला लोटण्याच्या प्रयत्नात    टॅक्सी ची हत्या केल्याची घटना नवी मुंबईतील  कोपरखैरणे येथे घडली.  गयासागर मिश्रा असे  टॅक्सी चालकाचे नाव असून त्याचा नोकरीवर पहिल्याच दिवस होता.  गोठीवली येथे  नातेवाइकांकडे राहत असून  ओलाच्या टॅक्सीवर चालक म्हणून कामाला लागला होता.   त्यानंतर ओलाच्या टॅक्सीवर चालकाची नोकरी मिळवली होती. नोकरीच्या पहिल्याच दिवशी रात्रपाळीवर असताना प्रवासी म्हणून बसलेल्या दोघांनी त्याची हत्या केली. त्याच्या हत्येप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी पकडलेले आकाश नवघने व किरण चिकणे हे दोघेही अमली पदार्थ विक्रीत सक्रिय आहेत. हे दोघे सेक्टर ४ येथील आदर्श बार समोरून मिश्रा याच्या टॅक्सीत प्रवासी म्हणून बसले.

यानंतर त्यांनी सर्व्हिस रोडने गाडी नेण्यास सांगून अवघ्या ३०० मीटर अंतरावर एकांताच्या ठिकाणी त्याची हत्या करून मोबाइल व पैसे लुटून पळ काढला. ज्या ठिकाणी ही घटना घडली तो परिसर रात्रीच्या वेळी गुन्हेगारी टोळक्यांचा अड्डा बनत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याकरिता महावितरणच्या उघड्या ट्रान्सफार्मर रूम, आडोशाच्या जागा तसेच मोकळी मैदाने वापरली जात आहेत, त्यामुळे नागरिकांनाही रात्रीच्या वेळी प्रवास करताना जीव मुठीत धरून घराबाहेर निघावे लागत आहे.