Sunday, August 25 2019 12:21 am

नीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन टीएमटी बससेवा सुरु

ठाणे : ठाण्याच्या मानपाडा येथील नीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन बससेवा सुरु करण्यात आली असून ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात टप्याटप्याने नव्या बस दाखल होत असल्याने नवनवीन मार्गावर प्रशासनाकडून बसफेऱ्या सुरू करण्याचा येत आहे.

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात टप्याटप्याने नवीन बस दाखल होत असल्याने ठाणे परिवहन सेवेच्या वतीने अजून काही मार्गवर बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेविका स्नेहा रमेश आंब्रे यांच्या मागणीनुसार नीलकंठ ग्रीन ते ठाणे स्टेशन अशी नवीन बससेवा टीएमटी प्रशासनाच्या वतीने सोमवारपासून सुरु करण्यात आली आहे या बससेवेचे उदघाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले,भाजपचे गटनेते नारायण पवार,नवयुग मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रमेश आंब्रे,नगरसेविका स्नेहा रमेश आंब्रे आदी सह मान्यवर यावेळी उपस्थित होते. नगरसेविका स्नेहा आंब्रे यांनी नागरिकांची बरेच वर्षपासूनची मागणी पूर्ण करून नागरिकांना दिलासा दिला आहे.

ठाण्यातील मानपाडा येथील नीलकंठ ग्रीन येथून सुटणाऱ्या या बससेवा टिकुजिनीवाडी,खेवरा सर्कल,काशिनाथ घाणेकर नाट्यगृह,वसंतविहार चौक,गांधीनगर,माजिवडा,कॅसलमील,जेल तलाव,कोर्ट नाका, ठाणे स्टेशन अशी चालवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या सेवेमुळे टिकुजिनीवाडी,खेवरा सर्कल,काशिनाथ घाणेकर येथील प्रवाशांचाही फायदा होणार आहे. नीलकंठ ग्रीन ते बोरिवली बस सेवा लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे स्थानिक नगरसेविका स्नेहा आंब्रे यांनी यावेळी सांगितले