Thursday, December 5 2024 5:55 am

निवृत्ती वेतन घेणाऱ्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील माजी सैनिक/फॅमिली पेन्शनरांसाठी दि.23 नोव्हेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन

ठाणे,17 :- ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व प्रकारचे निवृत्ती वेतन घेणारे माजी सैनिक/फॅमिली पेन्शनर यांच्यासाठी PCDA (NAVY)MUMBAI द्वारा DIGITAL LIFE CERTIFICATE CAMPAIGN 2.0 चे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांनी आतापर्यंत आपले जीवन प्रमाण पत्र भरले नाही किंवा काही अडचणींमुळे अद्याप भरू शकले नाहीत, अशा सर्वांसाठी गुरुवार, दि.23 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत पेन्शन मेळाव्याचे आयोजन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रूम नं 402, 4था माळा, जिल्हाधिकारी कार्यालय इमारत, टेंभी नाका / कोर्ट नाका, ठाणे (पश्चिम) येथे करण्यात आले आहे.
यावेळी येताना माजी सैनिक / फॅमिली पेन्शनर यांनी सोबत आधारकार्ड, PPO, पेन्शन अकाऊंट नंबर, आधार सोबत रजिस्टर केलेला मोबाईल, ज्यांचे निवृत्ती वेतन स्पर्श मध्ये मायग्रेट झाले असेल त्यांचा स्पर्श PPO नंबर आदी कागदपत्रे घेवून यावीत. तसेच या मेळाव्याचा जास्तीत जास्त पेन्शनर माजी सैनिक / फॅमिली पेन्शनर यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि.)प्रांजळ जाधव यांनी केले आहे.