Friday, May 24 2019 8:37 am

निवडणूक काळात शस्त्रे बाळगण्यास मनाई

ठाणे :भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वजनिक निवडणूक 2019 कार्यक्रम जाहीर केलाअसुन 10 मार्च पासुन आदर्श आचार संहिता लागु झाली आहे.या अनुषंगाने ठाणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात23 भिंवडी ,24 कल्याण ,25 ठाणे अशा तीन लोकसभा मतदार संघात दि. 29 एप्रिल रोजी मतदान व दि.23 मेरोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थाअबाधित रहावी म्हणून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील शस्त्रे परवानाधारकांना शस्त्रेताब्यात ठेवण्यास व बाळगण्यास दि. 23 मे पर्यंत मनाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त ठाणे शहर विवेकफणसाळकर यांनी दिले आहेत. या मनाई आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.