Tuesday, June 2 2020 3:04 am

निवडणुकीच्या धावपळीतही शिस्तप्रिय संजय केळकरांचे संघदक्ष संचलन  

ठाणे : दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने दरवर्षी ठाणे शहरात संचलन करण्यात येते. यंदाचे निवडणुकीचे वर्ष असल्याने या संचालनाला यावर्षी वेगळे महत्व प्राप्त झाले होते. विशेष म्हणजे प्रचाराच्या धावपळीतही ठाणे विधान सभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संजय केळकर या संचालनामध्ये दरवर्षीप्रमाणे सहभाग घेऊन ही परंपरा कायम ठेवली आहे . त्यामुळे एक शिस्तप्रिय उमेदवार म्हणून देखील नागरिकांना त्यांची वेगळी ओळख समजली आहे .      विजयादशमीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहरात विविध ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने संचालन करण्याची परंपरा आहे. ठाण्यात एकत्रितच संचालन करण्याची परंपरा असली तरी यावर्षी मात्र ठाणे शहरात ठीकठिकाणी संचालनाचे आयोजन करण्यात आले होते . याचाच एक भाग म्हणून ठाण्यातील सरस्वती (मराठी) शाळेपासून संचालनाला सुरुवात करण्यात आली. या ठिकाणाहून नौपाडा, गोखले रोड करत पाचपाखाडी अशा विविध परिसरात हे संचालन करण्यात आले. विशेष म्हणजे पाचपाखाडी परिसरात हे संचलन आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला.टेकड़ी बंगला येथील रहिवाश्यांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचालनचे स्वागत करून ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश नरसाणा यांनी संचलनावर फुलांचा वर्षाव केला.  यानिमित्ताने विशेष लक्ष वेधले ते ठाणे विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी. दरवर्षी न चुकता संजय केळकर हे या संचलनामध्ये सहभागी होतच असतात. मात्र यंदाचे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्याने आणि निवडणुकीच्या धावपळीतही संजय केळकर हे या संचालनामध्ये सहभागी झाल्याने त्यांची संघाच्या प्रति असलेली निष्ठा आणि त्यांचा शिस्तप्रिय स्वभाव या दोन्ही बाजू नागरिकांसमोर यानिमित्ताने समोर आल्या आहेत.