Monday, April 21 2025 11:01 am
latest

निळकंठ प्रकल्पातील ४९ सदनिकांचे वाटप झालेले नाही – स्थावर मालमत्ता विभागाची माहिती

ठाणे 12 : ठाणे महानगरपालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाकडे विकासकांकडून हस्तांतरित झालेल्या निळकंठ इमारतीतील सदनिकांचे वाटप करण्यात आल्याचे वृत्त काही माध्यमातून प्रसिद्ध झाले आहे. प्रत्यक्षात या प्रकल्पातील ४९ सदनिकांचे वाटप अद्याप झालेले नाही.

उपवन परिसरातील निळकंठ प्रकल्पात विकासकामार्फत ४९ सदनिका ठाणे महानगरपालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाकडे हस्तांतरित झालेल्या आहेत. या सदनिकांचे आजतागायत कोणालाही वाटप करण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे, या प्रकल्पातील घरे शास्त्रीनगर येथील रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या नागरिकांसाठी देण्याच्या निर्णयाची किंवा तत्कालीन महापालिका आयुक्त यांच्या याबाबत निर्देशांची कोणतीही नोंद स्थावर मालमत्ता विभागाकडे नाही.

निळकंठ या इमारतीचा ताबा सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात विकासकाकडून स्थावर मालमत्ता विभागाकडे हस्तांतरित झाला आहे. या सदनिकांचे वाटप अद्याप करण्यात आलेले नाही. त्यामुळे बोगस लाभार्थी दाखवून घरांच्या चाव्या देण्यात आल्याची चर्चा ही असत्य व निराधार असल्याचे ठाणे महानगरपालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने कळविले आहे.