Tuesday, July 23 2019 10:17 am

नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्याशी उदयनराजे यांनी दिलखुलास संवाद !

सातारा-: सातारा येथे सैनिक स्कूलमध्ये  झालेल्या कार्यक्रमात खा.उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला.आपल्या भाषणात त्यांनी फडणवीस,गडकरी यांच्या कामाच्या धडाक्‍याची प्रशंसा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित सुरू असलेल्या कार्यक्रमात ज्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा उल्लेख सत्कारासाठी झाला आणि उपस्थितांमधून टाळ्यांचा एकच गजर झाला.

भाषणात उदयनराजे यांनी भाजपावर कौतुकाचा पाऊस पाडला. मराठा आरक्षणाचा निर्णय हा अत्यंत धाडसी होता तो फडणवीस शासनाने घेतला. आणि जी विकासकामे शासनाने केली त्याचे फळ त्यांना नक्कीच मिळणार आहे अशा सूचक शब्दात उदयनराजे यांनी भाजप शासनाचे कौतुक केले.उदयनराजे यांच्या भाषणानंतर आसनस्थ होण्यासाठी जाताना उदयनराजे यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी चक्क नमस्कार केला. नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्याशी उदयनराजे यांनी दिलखुलास संवाद साधला.