Saturday, April 20 2019 12:03 am

नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात

अपघातात तीन जण जागीच ठार , मृतांमध्ये एक महिलेचा समावेश.

शहापूर :- ठाणे-नाशिक-मुंबई महामार्गावर आज भीषण अपघात झाला.या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
कंटेनर शहापूर तालुक्यातील आटगाव आला असता चालकाचा ताबा सुटला आणि हा अपघात झाला अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. यावेळी कंटेनर रस्ता सोडून लगतच असलेल्या रेल्वे रुळावर जाऊन धडकला. या अपघातात जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास चालू आहे.