Monday, January 27 2020 3:04 pm

नाशिक मध्ये आदिवासी महिलेने ‘सयामी’ जुळ्यांना दिला जन्म

नाशिक – अनेक वेळा महिलेने जुळ्यांना जन्म दिल्याची गोष्ट नवीन नाही परंतु आज एका  महिलेने चक्क  ‘सयामी’ जुळ्यांना जन्म दिला. आहे. नाशिकमधील जिल्हा शासकीय रुग्णालयात रविवारी रात्री उशिरा एक आदिवासी महिला रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली.  सोनोग्राफी न केल्याने गर्भात सयामी’ जुळे असल्याचे त्यांना अंदाज आला नाही. शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी केल्या नंतर  जिल्हा रुग्णालयात प्रसूती विभागातील तज्ज्ञांनी अवघड व आव्हानात्मक शस्त्रक्रिया केली.

या द्वारे महिलेची प्रसूती झाली. लाखोंच्या मागे अशी एखादी दुर्मीळ घटना घडते असे डॉक्टरांनी सांगितले. मातेची प्रकृती उत्तम आहे. या बाळांना पुढील शस्त्रक्रियेसाठी मुंबईत जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाणार असल्याचे अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाने यांनी सांगितले. ही प्रसूती दिवसभर रुग्णालयात चर्चेचा विषय ठरली.