Sunday, April 18 2021 11:17 pm

नाशिक जिल्ह्यात 36 हजार शिधापत्रिका रद्द

नाशिक : स्वस्त धान्य दुकानावर धान्य घेण्याकरीता न फिरकणाऱ्या लाभार्थी कुटुंबांच्या शिधापत्रिका रद्द करण्यात येत आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत तब्बल 36 हजार शिधापत्रिका रद्द केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी दिली आहे. कार्ड रद्द झालेल्या लाभार्थी कुटुंबांना स्वस्त धान्य उपलब्ध होणार नाही. त्यासाठी त्यांना नव्याने सर्व पुराव्यांसह अर्ज करावा लागेल. नियमात असेल तरच धान्य मिळेल असे पुरवठा विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.