Tuesday, April 23 2019 10:11 pm

नाशिकमध्ये हळदीच्या कार्यक्रमात हत्या

नाशिक- : नाशिकमध्ये हळदीच्या कार्यक्रमात हत्येचा एक धक्कादायक प्रकार घडला. लग्नाच्या कार्यक्रमात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या माजी नगरसेवक सुनिल वाघ यांच्या पुतण्याचा नाशिक रोड येथील कॅनल रोड लगत असलेल्या झोपडपट्टीजवळ रात्री खून झाल्याची घटना घडली आहे.

रोहित वाघ असं मयत तरुणाचं नाव आहे. लग्नाच्या हळदीमध्ये दोन गटांमध्ये भांडण झाली. ही भांडण सोडवण्यासाठी रोहित मधे पडला. पण यात त्याचीच हत्या करण्यात आली. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.