Friday, April 19 2019 11:59 pm

नाविन्यपूर्ण फ्लॅशमॉबच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती

ठाणे  : रविवारची सायंकाळ… ठाण्यातील विवियाना मॉल हा गर्दीने फुलून गेलेला.. या सर्व गर्दीत अचानक मध्येगाणे वाजते या गाण्यावर मुले नृत्य करतात.. आणि हे सर्व पाहण्यासाठी तळमजल्यापासून ते अगदी तिसऱया मजल्यापर्यतनागरिकांची गर्दी जमलेली… निमित्त होते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच ठाण्यात झालेल्या नाविन्यपूर्ण फ्लॅशमॉबचे.

     सध्या सर्वत्र निवडणुकीसंदर्भात मतदान जनजागृतीचे काम सुरू आहे. मॉलमध्ये होत असलेले नागरिकांची गर्दी लक्षातघेवून जिल्हा नोडल अधिकारी (SVEEP) उपजिल्हाधिकारी रेवती गायकर व ठाणे लोकसभा मतदारसंघातंर्गत 146 विधानसभामतदारसंघाच्या नोडल अधिकारी (SVEEP) सहाय्यक आयुक्त डॉ. चारुशीला पंडित यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार हे उपस्थित होते.

     जास्तीत जास्त नागरिकांनी 29 एप्रिल रोजी होत असलेल्या मतदानादिवशी मतदानप्रक्रियेत सहभागी होवून आपलेराष्ट्रीय कर्तव्य बजावावे यासाठी या आगळा वेगळा फ्लॅशमॉब उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमाला नागरिकांचाउत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फ्लॅशमॉब म्हणजे अचानक गर्दीत एखाद्या गाण्यांवर ग्रुपच्या माध्यमातून नृत्य सादर केले जाते यामाध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधून घेवून त्यांना मतदानाचे महत्व सांगून मतदान करणेबाबत आवाहन केले जाते. हा उपक्रमठाण्यात प्रथमच राबविण्यात येत आहे. ज्या ठिकाणी नागरिकांची गर्दी असेल त्या ठिकाणी सध्या हा उपक्रम विविध ठिकाणीघेतला जात आहे. विवियाना मॉलमध्ये रविवारी (14 एप्रिल, 2019) रोजी प्लॅशमॉब घेण्यात आला.