Wednesday, February 26 2020 9:35 am

नागरिकांच्या नागरी समस्या सोडविण्यासाठी येत्या सोमवारी होणार पहिला ‘महापौर जनसंवाद’

ठाणे : नागरिकांना थेट महापौर व प्रशासनातील अधिका-यांना भेटून नागरी कामांच्या समस्या मांडता याव्यात व त्यांचे निराकरण तातडीने करुन सर्वसामान्य  नागरिकांच्या कामांचा निपटारा तत्परतेने व्हावा किंवा त्यांना न्यायहक्क मिळावा महापौर नरेश म्हस्के यांच्या  अभिनव संकल्पनेतून जानेवारी 2020 पासून प्रत्येक  महिन्याच्या तिस-या सोमवारी  महापौर जनसंवाद हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार येत्या सोमवारी 20 जानेवारी 2020 रोजी पहिला ‘महापौर जनसंवाद’ सकाळी 11.00 वाजता या वेळेत महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे आयोजित केला आहे.

            बहुतांश वेळा सर्वसामान्य नागरिकांना वरिष्ठ्  अधिकारी यांची भेट घेणे शक्य नसतेकिंवा आपले म्हणणे स्पष्टपणे मांडता येत नसल्यामुळे अगदी लहान कामे सुध्दा दिवसेंदिवस प्रलं बित राहतात, त्यामुळे नागरिकांमध्ये महापालिकेच्या कामाविषयी नेहमीच  अविश्वास वाटतो. महापालिका कार्यक्षेत्रातील नागरी कामांविषयी असलेल्या समस्या तातडीने सोडविता याव्यात यासाठी महापौरांच्या  अभिनव संकल्पनेतून महापौर जनसंवाद हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या जनसंवादादरम्यान महापालिकेचे पदाधिकारी, महापालिकेचे  अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त,‍ संबंधि तविभागाचे  अधिकारी उपस्थीत  राहून नागरी कामाविषयी नागरिकांना असलेल्या तक्रारी ऐकतील व त्यांचे निराकरण करतील.  यामुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळेल व त्यांना या माध्यमातून खुले व्यासपीठ उपलब्ध होईल असा विश्वास महापौर नरेश म्हस्के यांनी व्यकत केला आहे. हा उपक्रम  प्रत्येक ‍ महिन्याच्या तिसऱ्या सोमवरी राबविला जाणार असून एखाद्या सोमवारी शासकीय सुट्टी असल्यास हा उपक्रम दुस-या दिवशी म्हणजेच मंगळवारी  राबविला जाईल, जेणेकरुन यात खंड पडणार नाही असेही महापौर यांनी नमूद केले. नागरिकांनी महापौर जनसंवाद या कार्यक्रमास येताना आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात आणावे असे आवाहन महापौर व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.