Saturday, August 24 2019 11:06 pm

नागराज मंजुळे ‘कोण होणार करोडपती’ मघ्ये लवकरच

मुंबई :- सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे हे ‘कोण होणार करोडपती’ चे सूत्रसंचालन करणार असून, ‘कोण होणार करोडपती’ चा पहिला भाग येत्या २७ मे रोजी रात्री ८.३० वाजता टीव्हीवर झळकणार आहे. सोनी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत हे जाहीर केलंय. ‘आमचे प्रश्न आणि तुमची उत्तरं सुरु होत आहेत 27 मेपासून! बघायला विसरू नका ‘कोण होणार करोडपती’ सोमवार ते गुरुवार, रात्री ८.३० वाजता …फक्त सोनी मराठीवर!’ अशी पोस्ट त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
हिंदी ‘केबीसी’मध्ये महानायक अमिताभ बच्चन हे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत होते. अमिताभ यांचा भारदस्त आवाज, सहभागी स्पर्धकांशी त्यांचा होणारा संवाद, प्रत्येक नव्या प्रश्नाबरोबर वाढणारी उत्कंठा आणि विजेत्यांना मिळणारी लाखा-लाखांची बक्षिसं यामुळं या कार्यक्रमानं लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. या पार्श्वभूमीवर मंजुळे यांचा नवा शो प्रेक्षकांच्या मनाची किती पकड घेतो, याबाबत आता उत्सुकता आहे