Thursday, August 22 2019 3:58 am

नवी मुंबईत जागतिक स्तनपान सप्ताह मार्गदर्शन शिबीर संपन्न

नवी मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जगातल्या आजच्या आईला आपल्या बाळाला लागणाऱ्या अंगावरील दुधाची  निकड किती प्रमाणात पूर्ण करता येते हा प्रश्नच आहे.  जागतिक आरोग्य संघटनेतर्फे १ ते ७ ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो व याच निमित्ताने नेरुळ येथील तेरणा तेरणा  स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे  मंगळवार ७ ऑगस्ट मोफत स्तनपान मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते. यामध्ये नवी मुंबईतील ५० नवजात बालकांच्या मातांनी सहभाग घेतला होता. यावेळी तेरणा स्पेशालिटी  हॉस्पिटलच्या एनआयसीयु विभागाच्या प्रमुख बालरोगतज्ञ  डॉ. मनीषा शिरोडकर यांनी उपस्थित मातांना मार्गदर्शन केले. यावेळी रबरी पुतळ्याची  बाहुली घेऊन दूध कसे पाजावे याचेही प्रात्यक्षिक तेरणा हॉस्पिटलच्या परिचारिकांनी करून दाखवले.  या शिबीरात नवजात बालकांची मोफत आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली व  तसेच प्रसूत झालेल्या मातांसाठी  आहार तंज्ञाकडून सल्लाही देण्यात आला. याविषयी अधिक माहिती देताना बालरोगतज्ञ  डॉ. मनीषा शिरोडकर म्हणाल्या, ” आईचं दूध हा बाळाचा पहिला हक्क त्याला मिळवून देण्यासाठी सगळीकडूनच प्रयत्न व्हायला हवेत. पहिल्यांदाच आई होणाऱ्या स्त्रीला बाळाला पाजणे, हे तंत्र आत्मसात करणे अवघड जाते. बाळ कसं धरावं इथपासून ते अगदी पाजताना बाळाची स्थिती कशी असावी, डोकं कसं धरावं, उजवीकडून पाजावं की डावीकडून, चोवीस तासातून कितीवेळा स्तनपान द्यावं, बाळ दूध घेतय की नाही हे कसं ओळखावं याबाबात सविस्तर मार्गदर्शन यावेळी तेरणा हॉस्पिटलतर्फे करण्यात आले.