Saturday, July 11 2020 10:43 am

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या सोयी सुविधांकडे लक्ष द्या – खासदार राजन विचारे यांची मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांच्याकडे मागणी

नवी मुंबई : मध्य रेल्वेच्या नव्याने पदभार स्वीकारलेल्या मध्य रेल्वे महाव्यवस्थापक संजीवजी मित्तल यांची मुंबई येथे भेट घेऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीत खासदार राजन विचारे यांनी नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानक सिडकोने विकसित केले आहेत. परंतु या रेल्वे स्थानकात प्रवाशांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध न झाल्याने प्रवाशांचे मात्र यात हाल होत आहेत. खासदार राजन विचारे यांनी नेरूळ रेल्वे स्थानकात ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या ठिकाणी सरकते जिने बसविण्यासाठी मागणी केली आहे. परंतु हे काम सिडको करणार कि, रेल्वे प्रशासन याबाबत एकमेकांवर चालढकल करीत आहेत. परंतु यात मात्र प्रवाशांचे हाल होत आहे ही वस्तुस्थिती खासदार राजन विचारे यांनी रेल्वे महाव्यवस्थापक यांना पटवून दिले. खासदार राजन विचारे यांनी असेही सांगितले कि, नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानके सिडकोने विकसित केले असले तरी, या मार्गावर रेल्वे आपण चालवीत आहोत. प्रवाशांकडून तिकीटासाठी लागणारे पैसे आपण वसूल करीत आहोत. तर प्रवाशांना सोयीही देण्याचा काम हे रेल्वेचे आहे यासाठी आपण याची दखल घेऊन धोरणात्मक निर्णय घेऊन नवी मुंबई तयार झालेल्या रेल्वे स्थानकामधील नेरुळ रेल्वे स्थानकात पहिला सरकता जिना मध्य रेल्वेने बसवावा अशी मागणी पत्राद्वारे केली. तसेच नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकातील महिला प्रवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बरोबर सुरक्षारक्षकांचीही वाढ करावी हे हि सांगितले. यावर मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांनी सिडको व रेल्वे प्रशासन यामध्ये झालेला करार मी पुन्हा अधिकाऱ्यांकडून पडताळून घेऊन याबाबत निर्णय जाहीर करू असे आश्वासन खासदार राजन विचारे यांना दिले.
त्याचबरोबर ठाणे रेल्वे स्थानकातील 50 वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या धोकादायक इमारतीतील सर्व कार्यालय तात्काळ पार्किंगच्या वरील मजल्यावरील स्थलांतरीत (शिफ्ट) करून घ्यावे. व ही धोकादायक इमारत तात्काळ तोडून या इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून काम सुरु करावे तसेच ठाणे रेल्वे स्थानकात सुरु असेलल्या पार्किंग प्लाझाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून या इमारती शेजारील असलेला सर्व परिसर मोकळा करून नागरिकांसाठी खुला करावा. अशी मागणी पत्राद्वारे केली. यावर मध्य रेल्वे महाव्यवस्थापक संजीवजी मित्तल यांनी या इमारतीच्या बांधकामाला लागणाऱ्या निधीची मागणी आम्ही केलेली आहे. असे सांगण्यात आले.