Tuesday, June 2 2020 4:04 am

नवी मुंबईतील महिलेच्या पोटात आढळला ५ किलो वजनाचा ट्यूमर तेरणा हॉस्पिटलमध्ये पार पडली यशस्वी शस्त्रक्रिया

नवी मुंबई : वाशी येथे राहणाऱ्या श्रीमती राधिका बनसोडे ( वय ३५ नाव बदललेले आहे) यांना  गेल्या सहा महिन्यापासून पोटदुखीचा त्रास  होता तसेच गेल्या तीन महिन्यापासून  त्यांना पोटदुखी, पोटात गोळे येणे, जड वाटणे अशा तक्रारी वाढल्या होत्या. सहा महिन्यामध्ये राधिका यांचे वजन १० किलोने कमी झाले होते तसेच त्यांची भूक सुद्धा कमी झाली होती.स्थानिक ठिकाणी त्यांच्यावर काही उपचार केले होते; पण आराम न वाटल्याने त्या नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या व त्यांनी  तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमधील लॅप्रोस्कॉपीक तज्ञ डॉ. नितीन तवटे यांची भेट घेतली. लॅप्रोस्कॉपीक तज्ञ डॉ. नितीन तवटे यांनी सिटी स्कॅन व इतर वैद्यकीय चाचण्या केल्या असता त्यांच्या पोटामध्ये ५ किलो चा ट्युमर आढळला . या ट्युमर चा आकार ४० सेमी x २५ सेमी होता. याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे लॅप्रोस्कॉपीक तज्ञ व शल्यविशारद डॉ.नितीन तवटे म्हणाले, ” जेंव्हा ही रुग्ण आमच्याकडे आली त्यावेळी तिच्या पोटाचा आकार वाढलेला होता तेंव्हाच आम्हाला संशय आला की पोटामध्ये काहीतरी गंभीर आजार आहे, कारण गेल्या  सहा महिन्यापासून त्यांच्यावर योग्य ते उपचार झाले नव्हते. त्यांच्या पोटामध्ये वाढलेला हा ट्युमर हा डाव्या ओव्हरी मधूनच (अंडाशयातून  ) आला होता. त्यामुळे तो काढताना इतर अवयवांना धक्का लागता कामा नये याची काळजी घेणे फार महत्वाचे होते तसेच तो फुटून इतर भागामध्ये पसरला जाऊ नये याचीही काळजी घेण्यात आली. त्यांना जोखमीची पूर्ण कल्पना देऊन, संमती घेऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. वैद्यकीय क्षेत्रामध्ये अशा प्रकारची सर्जरी ही फार जोखमीची मानली जाते. ट्युमरचा आकार मोठा असल्यामुळे त्याने ओटीपोटाचा भाग तसेच छोटे व मोठे आतडे व्यापले होते. हा ट्युमर  काढताना आम्हाला त्यांची डावी ओव्हरी (अंडाशय ) काढून टाकावी लागली आहे. ”   
सहसा अंडाशयामध्ये ५ ते १० सेमीचा ट्युमर आढळतो परंतु या वैद्यकीय  केसमध्ये एवढ्या वजनाचा ट्युमर मिळणे ही नवी मुंबईतील दुर्मिळ केस आहे. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये  झालेली ही यशस्वी  शल्यचिकित्सा म्हणजे तेरणा हॉस्पिटलमध्ये  उपलब्ध असेलल्या अत्याधुनिक वैद्यकीय  तंत्रज्ञानाचा अविष्कार आहे. नेरुळ येथील  तेरणा  स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असून हृदयरोग, पोटाचे विकार, कर्करोग, सांध्यांचे आजार व प्रत्यारोपण तसेच लहान व जन्मजात बाळांवर उपचार करण्यासाठी  तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत.