Tuesday, January 22 2019 1:38 pm

नवी मुंबईतील आरोग्यक्षेत्रात तेरणा समूहाचे महत्वाचे योगदान – डॉ. पदमसिंह पाटील ,जागतिक दर्जाची सुविधा देणाऱ्या तेरणा हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन विभागाचा विस्तार

नवी मुंबई : अत्यंत कलात्मक पद्धतीने बांधण्यात आलेल्या तसेच नवी मुंबई व रायगड जिल्ह्यात आरोग्यक्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नेरुळ -नवी मुंबई येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे अत्याधुनिक व अद्ययावत  आपत्कालीन विभागाचा विस्तार व नूतनीकरण करण्यात आले . या नूतनीकरण झालेल्या आपत्कालीन विभागाचे उद्घाटन तेरणा समूहाचे अध्यक्ष  मा. डॉ. पदमसिंह पाटील यांनी केले. नवी मुंबईत रुग्णालयांची मांदियाळी असली तरी तेरणा हॉस्पिटलमध्ये  नूतनीकरण  झालेला आपत्कालीन म्हणजेच कॅज्युल्टी विभाग नवी मुंबईच्या आरोग्यक्षेत्रात जागतिक दर्जाची सुविधा देणारा ठरणार आहे. या विभागाअंतर्गत २० बेड्सचा आपत्कालीन सेवा विभाग २४ तास ७ दिवस चालू असणार आहे. २४ तास भारतातील सर्वोच्च दर्जाच्या वैद्यकीय शिक्षण संस्थांमधून शिक्षण घेतलेले अनुभवी व कुशाग्र डॉक्टर्स नवी मुंबईतील तेरणा हॉस्पिटलच्या सर्व विभागांमध्ये कार्यरत आहेत. २४  तास रुग्णांना उच्च दर्जाची इमरजेंसी सेवा पुरवण्यासाठी परिचारिका विभाग तसेच, इतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्वाना परवडणारी व उच्च दर्जाची आरोग्यसेवा देणाऱ्या नवी मुंबईतील तेरणा हॉस्पिटलने रुग्णांचा विश्वास संपादन करून महाराष्ट्रातील आरोग्यसेवेत एक नवा पायंडा घातला असून नवी मुंबईतील आरोग्य क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले आहे असे मत तेरणा समूहाचे अध्यक्ष  मा. डॉ. पदमसिंह पाटील यांनी व्यक्त केले.