Thursday, January 28 2021 7:34 am

नवीमुंबईत माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार, मृतदेह सहा तास पडून

नवीमुंबई : रुग्णवाहिका वेळेत न आल्यामुळे एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सहा तास तसाच पडून राहिला होता. माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार नवी मुंबईमधील तुर्भे स्टोअर भागात घडला.  के. के. रोड परिसरात राहणारे हे रहिवासी शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता डम्पिंग ग्राऊंडच्या नजीक असलेल्या शौचालयात गेले होते. तिथेच त्यांचा मृत्यू झाला.

एक व्यक्ती पडून आहे. याबाबतची माहिती स्थानिक रहिवाशांनी नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिली. मात्र रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध न झाल्यामुळे त्यांचा मृतदेह रात्री अकरा वाजता शौचालयातून बाहेर काढून वाशी रुग्णालयात हलवण्यात आला. कोरोनाची टेस्ट झाल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.