Tuesday, July 23 2019 10:56 am

नववर्षाचं सर्वत्र जल्लोषात स्वागत !

पणजी-: डिसेंबर हा दिवस म्हणजे वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील तरुण लोकांसह वयोवृद्धपर्यंत अनेकांच्या चेहऱ्यावर उत्सह आणणारे दिवस म्हणून ओळखलं जातात. त्यामुळे ह्या दिवसात अनेकांचे विविध योजना आखल्या जातात. विशेष करून थंड वातावरणाचा मोठ्या प्रमाणात सहभाग ह्या योजनांमध्ये केला जातो. तसेच, गोवा हा सर्वांच्या पसंतीचं ठिकाण म्हणून सर्वांची पसंती असते.
31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी लोणावळा-खंडाळाही पर्यटकांनी गजबजून गेलंय. या विकेंडपासूनच लोणावळा शहर आणि परिसरातील बहुतांश हॉटेल, रिसॉर्ट, सेनेटोरियम फुल्ल झाले आहेत .पर्यटकांच्या स्वागतासाठी शहरातील हॉटेल्स, खासगी बंगल्यांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.व म्हणून, थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी हजारो पर्यटक गोवा आणि कोकणात दाखल झाले आहेत. पर्यटकांमुळे सर्व हॉटेल्स आणि समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेलेत. धम्माल, मस्ती, गाणी धुंद करणारी पेयं यांची सगळीकडेच रेलचेल असून पर्यटकांचे आगमन अजुनही सुरूच आहे.नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यापासून कोकणापर्यंतच्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी आतापासूनचं गर्दी केलीय. गेल्या काही वर्षात कोकणात नववर्ष साजरं करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढलीय. महाबळेश्वर आणि माथेरान या थंड हवेच्या ठिकणीही मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. मुंबईतही नववर्षाच्या स्वागतासाठीचा जल्लोष सुरू झालाय.
नववर्षाची सुरुवात भावभक्तीने म्हणजेच देव दर्शनाने व्हावे असे वाटत असते, त्यामुळे, नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीही सज्ज झाली आहे. रविवार असल्याने शिर्डीत भक्तांची प्रचंड गर्दी आहे. तर 31 डिसेंबरला मंदिरही रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे. साईसंस्थानकडून भक्त निवासांमध्ये राहण्याची व्यवस्था, प्रसादालयात भोजनाची व्यवस्था आणि परिसरात सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आलीये. तर भक्तांनी इथली हॉटेल्सही हाऊसफूल झाली आहेत.