Wednesday, June 3 2020 11:00 am

नवरी नटली फेम छगन चौगुले यांचे कोरोनामुळे निधन

मुबई : प्रसिद्ध लोककलावंत आणि नवरी नटली फेम छगन चौगुले यांचं गुरुवारी कोरोना ची लागण झाल्याने निधन झालं. त्यांना मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. उपचार सुरू असतांनाच छगन चौगुले यांनी अखेरचा श्वास घेतला.

‘मांढरदेवी काळुबाईची कथा’, ‘आईचा गोंधळ’, ‘कथा खंडोबाची’ हे त्यांचे अल्बम प्रसिद्ध होते .खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली काल बाई सुपारी फुटली’ या गाण्यांनी सर्वत्र धुमाकूळ घातला होता. या गाण्यांनीच छगन चौगुले यांना विशेष ओळख मिळवून दिली. याच बरोबर छगन चौगुले यांनी ‘कथा चांगुणाची’, ‘कथा श्रावण बाळाची’, ‘आईचे काळीज’, ‘अंबाबाई कथा : कथा तुळजापुरची भवानी’, ‘कथा देवतारी बाळूमामा’ यासारखे अनेक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाच्या सीडीज तर विशेष गाजल्या तर छगन चौगुले यांनी अनेकांच्या कुलदेवतांची गाणी आणि लोकगिते गायली आहेत.

छगन चौगुले हे मुळात जागरण गोंधळी होते. त्यामुळे त्यांची सुरुवात हे जारण गोंधळाच्या कार्यक्रमातून झाली. परंतु, केवळ जागरण गोंधळाचे कार्यक्रम न करता त्यांनी स्वत:तील कलेला व्याप्त स्वरुप दिले. त्यामुळे महाराष्ट्राने एक हाडाचा लोककलावंत गमाावला आहे.