Tuesday, December 1 2020 2:30 am

नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यावर; काशीविश्वेश्वराची केली पूजा

वाराणीस : लोकसभा निवडणुकीच्या दणदणीत विजयानंतर नरेंद्र मोदी   धन्यवाद रॅलीसाठी वाराणसी  दौऱ्यावर आहेत.  प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदा वाराणसी येथे पोहोचले व  पंतप्रधान मोदी यांनी  प्रथम काशीविश्वेश्वराचं दर्शन घेत पूजा केली. शिवाय काशीचा कोतवाल असलेल्या कालभैरवाचंही दर्शन घेतलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काशीविश्वनाथ मंदिरात त्यांच्यासोबत भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथसुद्धा बरोबर होते.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, भाजप अध्यक्ष अमित शाह नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते.

नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी वाराणसी शहरभर सजावट करण्यात आली असून, फुलांचा वर्षाव होणार आहे. पोलीस लाईन ते विश्वनाथ मंदिरामधील सात किमीचं अंतर ते बंद गाडीतून पार केलं.   त्यानंतर वाराणसीत पंडित दीनदयाल हस्तकला संकुलात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशीही मोदी संवाद साधणार आहेत. तसेच कार्यकर्त्यांनी राज्यापासून ते जिल्ह्यापर्यंत केलेल्या कामाचंही मोदी गौरव करणार आहे.