ठाणे, १७ : भारतीय जनता पार्टी ठाणे शहर च्या बाळकूम मंडल च्या वतीने नमो चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे .ठाण्यातील हायलँड पार्क ग्राउंड येथे आयोजित तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन शुक्रवारी एका शानदार कार्यक्रमात करण्यात आले .
युवकांमध्ये क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी भाजपच्या बाळकूम मंडळाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . भारताचे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने ही स्पर्धा होत आहे . पहिले पारितोषिक १ लाख तर उपविजेत्या संघाला ५० हजार रुपये देण्यात येणार आहे . या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून क्रिकेट प्रेमी खेळण्यासाठी आले आहेत.ह्या स्पर्धेचे उदघाटन ज्येष्ठ पत्रकार संपादक ठाणे वैभव मिलिंद बल्लाळ, हायलँड डेव्हलपरचे संचालक श्री गौरव शर्मा, डॉ. गुरुनाथ पंडित मॅनेजिंग ट्रस्टी पाटकर कॉलेज समूह, श्री. शशी नाईक द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक, मनोहर डुंबरे गटनेते भाजपा, विलास साठे सरचिटणीस, भाविन ठक्कर, नीलेश कोळी, संजय लाड, प्रणव, स्थानिक नागरिक तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पुढील तीन दिवस चालणार असून या स्पर्धेत आपण जरूर भेट द्या असे आव्हान आयोजक भाजप बाळकूम मंडळ अध्यक्ष तन्मय भोईर आणि भाजप उपाध्यक्ष सुजय पत्की यांनी केले आहे.
या स्पर्धे दरम्यान ठाण्यातील सामाजिक संस्थांचा रोख रकमेसह सन्मान , आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू, पोलीस आणि कलाकारांच्या क्रिकेट मॅचेस हे हा स्पर्धेचे आकर्षण ठरणार आहे .