ठाणे, 20: राज्य सरकारच्या नगरविकास विभागामार्फत शहर सौदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. याशिवाय, नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे.
ठाणे शहरात ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमांतर्गत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर हे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये सौदर्यीकरण आणि स्वच्छता या उपक्रमांचाही समावेश आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील रस्त्यालगतच्या संरक्षक भिंती, उड्डाण पुल, पादचारी पुल याठिकाणी आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. शहरातील शासकीय इमारती, उड्डाण पुल, पादचारी पुलांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. याशिवाय, शहरच स्वच्छ ठेवण्यावरही भर देण्यात येत आहे. या उपक्रमांमुळे पालिकेने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागामार्फत शहर सौदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.