Tuesday, July 23 2019 10:52 am

धुळे महानगरपालिकेत भाजपा विरजमान

धुळे-: काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवार मंगला अर्जुन यांनी महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने चंद्रकांत सोनार यांची बिनविरोध निवड झाली. तर धुळे महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आली असून महापौरपदी चंद्रकांत सोनार यांची निवड झाली आहे. महापौर, उपमहापौर निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपाचे महापौर, उपमहापौर निवडून आले आहेत. भाजपा आणि बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रतिष्ठेच्या ठरलेल्या येथील महापालिका निवडणुकीत तीनवरून ५० जागांपर्यंत मुसंडी मारत भाजपाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

धुळे महापालिका निवडणुकीत भाजपाने 50, काँग्रेसने सहा, राष्ट्रवादीने आठ आणि एमआयएमने चार जागा जिंकल्या. शिवसेना आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी दोन जागांवरच समाधान मानावं लागलं. लोकसंग्राम आणि बसपा प्रत्येकी एक जागा जिंकण्यात यशस्वी राहिले. दोन जागांवर अपक्ष उमेदवारांचा विजय झाला.